अप्पर पोलीस महासंचालक देवेन भारतींवर गुन्हा

मुंबई | प्रतिनिधी |
अप्पर पोलीस महासंचालक आणि सीनिअर आयपीएस देवेन भारती यांच्या अडचणीत वाढ झालीय. कारण भारतींसह दोन पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीविरोधातलं बोगस पासपोर्टचं हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे तक्रार एका माजी पोलीस निरीक्षकाने केलेली होती आणि त्याच्याच पाठपुराव्यानंतर आता एफआयआर दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणात ज्या इतर एका पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झालाय, त्यात एसीपी दीपक फटांगरे यांचा समावेश आहे.
भाजप हाजी हैदर आजम.हे मौलाना आझाद मायनॉरीटी आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रेश्मा खान. ती सुद्धा बनावट पासपोर्ट प्रकरणी आरोपी असून फरार आहे. 2017 साली मुंबईत रहाणार्‍या बांगलादेशींविरोधात पोलीसांनी एक मोहीम हाती घेतली होती. त्याच दरम्यान रेश्मा खाननं जे कागदपत्रं देऊन पासपोर्ट मिळवला ते बोगस असल्याचं दिसून आलं. रेश्मा खानचा जन्मदाखला, आधार अशा इतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्पेशल ब्रँचनं पश्‍चिम बंगाल सरकारकडे रितसर चौकशी केली.

Exit mobile version