कोकणात पुन्हा धुमशान; भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे

राणेंना लागला वीजेचा शॉक; दरेकरही हबकले!
। कुडाळ प्रतिनिधी ।
कणकवलीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी एका व्यासपीठावर नारायण राणे जात असताना त्यांना शॉक लागला. त्यांचा तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागला.यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या प्रवीण दरेकर यांनाही ते पाहून धक्का लागला. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान पाऊस पडून गेल्याने त्यांना तारेला स्पर्श होऊन राणेंना शॉक लागला.

कोकणात सुरू असलेल्या भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यासोबतच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह तीस ते चाळीस जणांवर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात जमावबंदीचा आदेश मोडणार्‍यांविरोधात प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कणकवली पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रेच्या आधीच जमावबंदीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. पण हे आदेश झुगारत याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानेच हे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्गात आली. यावेळी राणेंच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या जन आशीर्वाद यात्रेत संचारबंदीचे आदेश असतानाही गर्दी झाली. तसेच कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत. कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे उद्धव ठाकरेंवर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी शिवसेनेकडून वैभव नाईक यांनीही शाखेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version