उसर नाका येथे पोलिसांना मारहाण करीत शासकीय कामात अडथळा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील अलिबाग रोहा राज्य महामार्गावरील उसर नाका रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सीताराम थोरात ( वय 56 वर्षे, पोलीस निरीक्षक, रेवदंडा, अलिबाग, जिल्हा-रायगड) हे शासकिय काम करित असताना त्यांचा हात पिरगळुन, पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार राजकुमार नंदगावे यांना जोरात धक्का मारीत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अशोक सीताराम थोरात यांनी दिली आहे.

उसर नाका येथे अलिबाग रोहा रोडवर शुक्रवारी (दि.१३) सकाळी १० वाजता अलिबाग येथील फिर्यादी अशोक सीताराम थोरात हे रेवदंडा गुन्हा रजि नं. 76/2022 मध्ये तपासकामी निलेश जयराम गायकर,अंकलेश आत्माराम शिंदे या दोन आरोपींना उसर येथे अटक करायला गेले असता उसर नाक्यावर उभ्या असलेल्या दोन्ही आरोपींना सदर गुन्हयाच्या तपासाकरीता रेवदंडा पोलीस ठाणे येथे घेऊन जाण्यासाठी सरकारी गाडीत बसण्यास सांगितले असता आरोपींनी नकार देउन अशोक थोरात यांचा हात पिरगळुन व पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे यांना जोरात धक्का मारून ढकलुन दिले.

आरोपी निलेश जयराम गायकर,अंकलेश आत्माराम शिंदे, संदेश सदानंद शिंदे, अजय आत्माराम शिंदे, उमेश मधुकर ठाकूर, गणेश कृष्णा शिंदे,अरविंद शिंदे,गणेश शिंदे सर्व राहणार-उसर, तालुका-अलिबाग, जिल्हा- रायगड) यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन बेकायदेशिरपणे एकत्र येउन फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी जोरजोरात हुज्जत घालुन दमदाटी करून फिर्यादी व साक्षीदार हे शासकिय काम करित असताना त्याचे शासकिय कामात अडथळा आणला.

सदर गुन्ह्यात चार आरोपींना शुक्रवारी अटक केले असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक शिवकुमार राजकुमार नंदगावे हे करीत आहेत.

Exit mobile version