| जिनिव्हा | वृत्तसंस्था |
अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या देशांमध्ये फिफा विश्वकरंडक या अत्यंत मानाच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विश्वकरंडकाला 100 दिवस बाकी असताना अमेरिका-इराणमधील युद्ध, मेक्सिकोमधील हिंसाचार, राजकीय तणाव व आर्थिक प्रश्न यामुळे नवे आव्हान उभे ठाकले आहे. यंदाचा फुटबॉल विश्वकरंडक हा अमेरिका आणि इतर देशांतील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणार आहे. काही देशांवर अमेरिकेने टॅरिफ (कर) लावले आहेत, काहींवर प्रवास निर्बंध आहेत. यामुळे समस्या निर्माण होऊ शकणार आहे.
इराणने पात्रता मिळवली असली तरी तो संघ अमेरिकेत खेळायला येईल का, याबाबत अनिश्चितता आहे. अमेरिका आणि इस्राईलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इराणचे फुटबॉलप्रमुख मेहदी ताज यांनी सांगितले, की या हल्ल्यानंतर आम्ही आशेने वर्ल्डकपकडे पाहू शकत नाही. इराणने अद्याप स्पर्धेतून माघार जाहीर केलेली नाही. गेल्या 75 वर्षांमध्ये पात्र ठरलेल्या कोणत्याही संघाने माघार घेतलेली नाही. बेल्जियम, इजिप्त आणि न्यूझीलंड यांच्यासह इराण या देशाचा समावेश एका गटात आहे.तिकिटांच्या किमतींवर टीकाफिफाने 70 लाख तिकिटे विक्रीसाठी ठेवली आहेत. तिकिटांच्या किमती 8,680 डॉलर्सपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे टीकाही होत आहे. फिफा अध्यक्ष गियानी इनफॅनटिनो यांनी 104 सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली असल्याचा दाव केला आहे.
क्रिकेट विश्वषकावर परिणाम
इस्रायल-अमेरिका यांच इराणविरुद्ध युद्ध सुरु झालं आहे. त्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटांमुळं हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळं इराण, इस्रायल आणि शेजारील देशांमधील विमानतळांवर लोक अडकून पडले आहेत. या युद्धाचा आता 2026 च्या टी-20 विश्वचषकावर परिणाम झाला आहे, त्यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं एक प्रेस रिलीज जारी केली आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी बॅकअप प्रवास योजनांवर काम सुरु केलं आहे. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांमुळं आखाती देशांमध्ये, विशेषतः दुबईसारख्या प्रमुख ट्रान्झिट हबमध्ये, विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळं आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी या हबचा वापर करणाऱ्या अनेक खेळाडू, संघ अधिकारी, सामनाधिकारी, प्रसारण संघ आणि कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला धोका निर्माण होऊ शकतो. आयसीसीने स्पष्ट केलं आहे की मध्यपूर्वेतील परिस्थितीचा स्पर्धेवर थेट परिणाम होत नाही. भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा 7 फेब्रुवारी रोजी सुरु झाली आणि 8 मार्च रोजी संपेल. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत आहेत आणि उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीसाठी फक्त काही संघच शर्यतीत आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाबाहेर पडल्यामुळं आता सर्व नॉकआउट सामने भारतात होतील.
खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, आयसीसीनं तात्काळ त्यांच्या प्रवास, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा पथकांना सक्रिय केलं आहे. प्रत्येकजण सुरक्षितपणे घरी पोहोचेल याची खात्री करण्यासाठी ही पथकं दिवसरात्र काम करत आहेत. प्रमुख विमान कंपन्यांशी समन्वय साधून पर्यायी मार्गांचा शोध घेतला जात आहे. आयसीसीनं एका प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, आयसीसी ट्रॅव्हल अँड लॉजिस्टिक्स पथक युरोपियन, दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई केंद्रांद्वारे कनेक्शनसह पर्यायी मार्ग पर्याय ओळखण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे. आयसीसीन पुढं म्हटलं आहे की, आयसीसी सुरक्षा सल्लागार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत आणि परिस्थिती विकसित होताना सल्ला देतील. एक समर्पित आयसीसी ट्रॅव्हल सपोर्ट डेस्क देखील सक्रिय करण्यात आला आहे.
फॅ फेस्ट कार्यक्रम रद्द
विश्वकरंडकका दरम्यान मोठ्या स्क्रीनवर सामने पाहण्यासाठी आयोजित होणारे फॅ फेस्टफ कार्यक्रम अमेरिकेत काही ठिकाणी रद्द किंवा कमी केले जात आहेत. न्यूयॉर्क/न्यू जर्सीने आपल्या शहरातील कार्यक्रम रद्द केला.







