• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निंदनीय टीका

Krushival by Krushival
September 7, 2021
in sliderhome, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्य या हिंदी साप्ताहिकाने देशद्रोहींच्या यादीत एक नवीन नाव सामील केले आहे. ही घटना अभूतपूर्व असून असे पहिल्यांदाच घडत असल्याने, त्या दृष्टीने ती ऐतिहासिक घटना आहे. आतापर्यंत राजकीय धुरळा निर्माण करण्यासाठी अशी चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप व टीका व्हायाची आणि त्यात दोन्ही बाजूने राजकीय लोकांचाच समावेश असायचा. यावेळी पहिल्यांदाच एका प्रख्यात कंपनीला देश विघातक कारवाया करणार्‍या लोकांशी हातमिळवणी करून देशाची आर्थिक घडी खिळखिळी करण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इन्फोसिस या भारतातील नवउद्यमी क्षेत्रातील सर्वाधिक यशस्वी तसेच भारताचा मानबिंदू असलेल्या कंपनीबाबत तसेच अनेकांचे प्रेरणास्थान असलेले या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्यावरही अशाच प्रकारची व्यक्तिगत टीका केली आहे. त्याबद्दल खूप गदारोळ झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीप्रमाणे हे आपले मुखपत्र नव्हे, असे सांगून या सगळ्या वादापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दहा मुखांनी बोलायचे आणि एखाद्या मुखातील बोल अंगाशी आले की ते आपले नाही असे जाहीर करायचे. इन्फोसिस कंपनीने केंद्र सरकारच्या जीएसटी आणि प्राप्तिकर भरणा करण्यासाठी जे नवीन पोर्टल सरकारने आणले आहे, त्याचे कंत्राट मिळवले होते आणि त्याची अंमलबजावणी जूनपासून सुरू झाली होती. तथापि सुरुवातीपासूनच त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या, अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे अनेकांना प्राप्तिकर किंवा जीएसटी भरणे आव्हानात्मक बनले. मधल्या काळात ती बंदही होती. त्यामुळे सरकारच्या दृष्टीकोनातून ही एक नामुष्कीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच बोलावून घेऊन त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत पोर्टलमधील सर्व अडथळे आणि त्रुटी दूर करण्याची ताकीद दिली. त्या पार्श्‍वभूमीवर या साप्ताहिकात ही टीका करण्यात आलेली आहे. इन्फोसिस ही देशाच्या विरोधात काम करणार्‍या घटकांना मदत करत आहे असा आरोप करून आणि ते अशाच प्रकारची सेवा परदेशी ग्राहकांनाही देतात का, असा सवालही करण्यात आला आहे. हा प्रश्‍न सरकार आणि इन्फोसिस या दोघांमधल्या कराराशी संबंधित आहे आणि त्या दोघांनीच तो सोडवला पाहिजे. त्यामध्ये तिसर्‍या कोणी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. इन्फोसिसचे एकेकाळचे प्रमुख टीव्ही. मोहनदास पै यांच्यानुसार त्रुटी दोन्ही बाजूने आहेत. सरकारने निकष स्पष्ट सांगायला हवेत आणि त्याच्या अंमलबजावणीची कटिबद्धता कंपनीकडून पाहिजे. गेल्या 30 वर्षांत इन्फोसिसने जगभरात अनेक मोठे प्रकल्प हाताळले, ते कार्यवाहीत आणले आहेत. मोठे प्रकल्प कार्यवाहीत आणताना अनेक त्रुटी येऊ शकतात. त्यावर तोडगा काढायचा असतो. लॉकडाउनच्या काळातही शंभर अब्ज डॉलर्सची उलाढाल करणारी आणि देशातील लाखो लोकांना रोजगार पुरवणारी कंपनी ही देशद्रोही आहे असे म्हणणे हे अनावश्यक, मूर्खपणाचे किंवा विशिष्ट हेतूने केलेले विधान आहे असे म्हणायला जागा आहे. महिनाभरापूर्वी व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी टाटा समूहाच्या विरोधात अशाच स्वरूपाचे विधान केले होते. त्यामुळे काही गुजराती उद्योजक सोडल्यास बाकी सर्व उद्योजकांना फटकारण्याचे, त्यांना जागा दाखवून देण्याचे काम सुरू आहे, एक अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रश्‍न असा आहे की कोण देशप्रेमी आणि कोण देशद्रोही हे ठरवून सर्टिफिकेट देण्याचे अधिकार यांना कोणी दिले? दुसर्‍या प्रश्‍नावर सर्वांनीच विचार करायला हवा. तो म्हणजे आतापर्यंत हे केवळ मुस्लिम विरोधी आणि हिंदूंच्या बाजूचे आहेत, असेच वाटत होते. परंतु आता त्याची झळ हिंदूंना देखील पोचू लागली आहे. त्यामुळे आपल्यावर टीका करणारा, विरोधी मत व्यक्त करणारा कोणीही देशद्रोही आहे असे ठरवण्याच्या या प्रवृत्तीला विरोध करायलाच पाहिजे. कारण राजकीय क्षेत्रातील चिखलफेक, टीका, आरोप-प्रत्यारोप ही वेगळी गोष्ट असते. परंतु पहिल्यांदाच एका जागतिक पातळीवर नाव कमावलेल्या उद्योगाला अशाप्रकारे बदनाम करणे, ही उद्योग क्षेत्रासाठी चांगली गोष्ट नाही. सरकार आणि उद्योजक यांच्यामध्ये मतभेद असतात, तसे असले तरी दोघांत एक संयमाची आणि एक आदराचे नाते असते, ते कायम ठेवावे लागते. मोठे उद्योगही देशसेवेचेच काम करत असतात. त्यामुळे या विधानाचा विरोध केलाच पाहिजे, ते विधान मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे.

Related

Tags: Editorialeditors wordsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Previous Post

बोर्ली मांडला विभागातील मांडला पूल गेला वाहून; साळव तपासणी नाक्याजवळ दरड कोसळली

Next Post

भारतीय मुस्लिमांची पुन्हा चर्चा

Krushival

Krushival

Related Posts

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

भारतीय मुस्लिमांची पुन्हा चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?