महिलेची सव्वाचार कोटींची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

खारघरमध्ये राहणार्‍या एका महिलेला शेअर बाजारात रक्कम लावल्यास अधिकचा नफा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल सव्वाचार कोटी रुपयांची फसवणूक ऑनलाईन पद्धतीने भामट्यांनी केली आहे. खारघरमधील केशर हार्मोनी या इमारतीमध्ये राहणार्‍या सूचेता अरुण पौडवाल यांना भामट्यांनी शेअर बाजारात खरेदी-विक्री केल्यास सर्वाधिक नफा मिळेल यासाठी भामट्यांनी संपर्क साधला.

28 एप्रिल ते 7 जुलैदरम्यान भामटे सूचेता यांच्या संपर्कात होते. सूचेता यांनी 4 कोटी 40 लाख 25 हजार एवढी रक्कम गुंतवली होती. त्यापैकी 5 लाख 93 हजार 557 रुपये त्यांना परत मिळाले. उर्वरित 4 कोटी 34 लाख 31 हजार रुपयांची फसवणूक झाल्याने सूचेता यांनी पोलीस ठाणे गाठले. सूचेता यांना अ‍ॅडवेन्ट इंटरनॅशनल डी – 875 या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये भामट्यांनी सहभागी करुन घेतले होते. याबाबत नवी मुंबई पोलिसांचे सायबर सेलचे पोलीस पथक विशेष तपास करत आहे.

Exit mobile version