मिरची खरेदीसाठी बाजारात गर्दी

घरगुती मसाला बनविण्यावर गृहीणींचा कल
| खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा शहरातील मिरची गल्लीत मसाल्याचे विविध प्रकारचे पदार्थ खरेदी करण्यासाठी सध्या बाजारात गृहीणींची एकच लगबग सुरू झाली असून बाजारात खरेदीसाठी गर्दीही वाढू लागली आहे. बाजारात मिळणारे विविध कंपन्यांचे तयार मसाले परवडत नसल्याने मिरची खरेदी करून त्याचा मसाला बनविण्यावर गृहीणींचा कल दिसून येतो. त्यामुळे शंकेश्‍वरी, बेडगी, कश्मिरी, गंटूर, लवंगी, कोल्हापूरी मिरची आदी मिरची खरेदी करणे, त्याचबरोबर धडे, बडीशोप, अख्खा मसाला, जिरे, मोहरी, हळकुंड आदी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गृहीणींची लगबग सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील मिरची गल्लीत सध्या मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला येत असताना दिसत आहेत. तर विविध नैसर्गिक आपत्ती, अधूनमधून कोसळणारा अवकळी पाऊस, मिरचीचे उत्पादनात होणारी घट आदींमुळे गतवर्षापेक्षा यावर्षी मसाल्याचे विविध पदार्थांसह मिरचीचेही भाव वाढले असल्याचे दिसून येत असले तरी दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ व मसाले यांची मोठीच आवश्यकता असल्याने किंमती कितीही जरी वाढल्या तरी मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्याचा गृहीणींचा उत्साह मात्र कायम आहे.

दैनंदिन जीवनात आहारामध्ये सर्व प्रकारच्या पदार्थात मसालृयाचे महत्त्व फार मोठे असल्र्याने महागाई वाढली तरी मसाल्याचे पदार्थ हे खरेदीच करावे लागतात. -शिल्पा मरवडे, गृहीणी,रोहा

Exit mobile version