। पनवेल । वार्ताहर ।
गेले काही महिने शासनामार्फत देण्यात येणारे ऑनलाईन धान्य वाटप तांत्रिक अडचणीमुळे रास्त भाव धान्य दुकानदारांना लाभार्थींना वाटप करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु, गेल्या दोन दिवसापासून ऑनलाईन धान्य वाटप पूर्ववत सुरू झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात लाभार्थींना धान्य मिळत असल्याने ग्राहकांनी दुकानात गर्दी करीत आहेत.
शासनामार्फत मध्यमवर्गीयांना तसेच तळागाळातील सामान्य नागरिकांना रास्त भाव धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात येते. त्याचा फायदा लाखो ग्राहकांना होत असतो. पनवेलमध्ये सुद्धा अशा प्रकारची शेकडो दुकाने असून गेले काही महिने शासनामार्फत देण्यात येणारे ऑनलाईन धान्य वाटप तांत्रिक अडचणीमुळे रास्त भाव धान्य दुकानदारांना लाभार्थींना वाटप करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही अडचण दूर झाल्याने आता गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन धान्य वाटप पूर्ववत सुरू झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात लाभार्थींना धान्य मिळत असल्याने ग्राहकांनी दुकानात गर्दी होत आहे.
माझ्याकडे 700 रेशनिंग कार्डधारक असून शासनाची ऑनलाईन सेवा पूर्ववत होताच या सर्वांना संपर्क साधून त्वरित रेशन घेवून जाण्याचे आवाहन केले आहे.
– प्रतिक देवचंद बहिरा, दुकान विक्रेते