| म्हसळा | वार्ताहर |
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा म्हसळा शहरातील रोहिदास नगर येथील श्री स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात विधीवत पूजापाठ आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. स्वामी भक्तांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सकाळी 6 वाजल्यापासून श्री स्वामी मठात स्वामींच्या मूर्तीस अभिषेक, काकड आरती, आरती, महाप्रसाद, महाआरती आणि सुस्वर भजनाचे आयोजन केले होते. सर्व स्वामी भक्त, श्री स्वामी समर्थ सेवेकरी आणि मठ कमिटी यांनी भक्तांना दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी निमंत्रित केले. त्यानुसार हजारो श्री स्वामी भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवेकरी आणि मठ कमिटी यांनी स्वामींच्या दर्शनासाठी आलेले मान्यवर पदाधिकारी,अधिकारी आणि कार्यकर्ते यांचे पुष्पगुच्छ आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नित्यपाठ ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
म्हसळा येथे भक्तांची मांदियाळी
