| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
माघ कृष्ण त्रयोदशी तथा महाशिवरात्री निमित्त मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील श्री शंकर मंदिरात दर्शनासाठी यशवंतनगर पंचक्रोशीतील हजारो अबालवृद्ध भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
मंदिराचे तसेच गावच्या पंच कमिटीचे पुजारी विवेक वामन तथा बाळा ठोसर यांनी पहाटे मंदिरात पुजा केली. त्यानंतर भाविकांची मोठी रांग दर्शनासाठी मंदिरात लागली होती. पंच कमिटी अध्यक्ष उमाकांत रघुनाथ चोरघे व अन्य सदस्य या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी महादेवाला बेल, पांढऱ्या रंगाची फुले, नारळ, दूध आदी अर्पण करून भक्तांनी मनोभावे पुजा केली. या निमित्ताने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गावातील भजनी बुवांनी संगीत भजने सादर केली. रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील अन्य ठिकाणच्या भक्तांनीही या प्राचीन मंदिरात येऊन दर्शन घेतले.