| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले शेतकर्यांचे श्रद्धास्थान आवास येथील नागेश्वर मंदिरात श्रावणातील पहिला सण नागपंचमीनिमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांनी दर्शनासाठी पहाटे तीन वाजल्यापासून हजेरी लावली होती. मंदिर परिसर मिठाई, हार व इतर दुकानांनी गजबजला होता.








