। पनवेल । वार्ताहर ।
गुरुपौर्णिमेनिमित्त पनवेल पंचक्रोशीत असलेल्या विविध मंदिर, मठात भक्तांची गर्दी उसळली होती. शहरातील श्री स्वामी समर्थ मठ मंदिर, गावदेवी पाडा, रेल्वे स्टेशन मार्गावरील श्री साई नारायण बाबा मंदिर, दुर्गामाता मंदिर, इच्छापूर्ती गणेश मंदिर, लाईन आळी येथील मारुती मंदिर, नवनाथ मंदिर आदी ठिकाणी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक ठिकाणी काकड आरती, होम, हवन, पूजा अर्चा, महाआरती, महाप्रसाद, भजन-किर्तने यांचे आयोजन करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी आकर्षक फुलांची आरस, सजावट तर काही ठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सर्व धार्मिक कार्यक्रमाला भक्तांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.