पालीत संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

मार्च महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीला गुरुवारी (दि.28) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत होते.

कडक उन्हाळा असल्यामुळे रसवंती गृहे, दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य, काजूगर, आंब्याच्या कैर्‍या विक्रेते, प्रसाद व पेढेवाले होते. मंदिर परिसरात वर्दळ होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी अत्याधुनिक व विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. प्रसादालय खुले आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

जितेंद्र गद्रे, अध्यक्ष,
बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, पाली


Exit mobile version