| पनवेल | वार्ताहर |
रविवारी रात्री पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावर पाणी साचल्याने पनवेल-सिएसटी मार्ग पुर्णपणे ठप्प झाला असल्याने फक्त वाशीपर्यंत रेल्वे जात होती. यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असून पनवेल स्थानकात मोठी गर्दी झाली होती.
![](http://krushival.in/grygrars/2024/07/Panvel1-3.jpg)
तसेच, रेल्वेने मुंबईकडे जाणार्या प्रवाशांची पावले पनवेल एसटी डेपोकडे वळली होती. दादर, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढल्याने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.