| आगरदांडा | प्रतिनिधी |
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने मुंबई, पुणे, ठाणे शहरातून कुटुंबासह मोठया संख्येने पर्यटक मुरुड समुद्रकिनारी आले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी प्रचंड गर्दी झाली आहे. तालुक्यातील काशीद-बीच, दत्तमंदिर, गांरबी, जंजिरा किल्ला परिसरात पर्यटक आले आहेत. पर्यटक पोहण्यासाठी व ऊंट स्वारी, बाईकवर व घोडागाडीतुन सहकुटुंब समुद्रकिनारी फिरण्याची मजा लुटत आहेत. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथे गाडया पार्क करुन जेट्टीवरुन शिडयांच्या होड्याव्दारे किल्लाकडे पर्यटकांना नेले जातत आहे.