। उरण । वार्ताहर ।
बाप्पाच्या स्वागतासाठी उरणच्या बाजारामध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. शहरातील एकमेव बाजारपेठ असल्याने फुले, हार, प्लास्टिक फुले, फ्लॉवर पट्टा, मुकूट, कंठी, आकर्षक विद्युत माळा खरेदी करण्यासाठी बाजारात एकच झुंबड उडाली होती. तसेच मकर सजावटीसाठी लागणारे साहित्य, किरणा सामान, विविध प्रकारची मिठाई,फळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.काही गणेश भक्त हे पर्यावरण मुक्त करण्याच्या उद्देशाने फुल झाडे सह इतर विविध प्रकारची आकर्षक झाडे खरेदी करण्यासाठी रस्त्याजवळील नर्सरीमध्ये गर्दी करत होते. यावेळी ग्राहकांना सेवा देताना व्यापारी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत होती.