मैदानासाठी राडा! बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

| अमरावती | प्रतिनिधी |

प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचार सभेसाठी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमधील सायन्स कोर मैदान 24 तारखेसाठी बुक केले होते. त्यासाठी त्यांनी संबंधित शुल्कही भरले होते. दरम्यान, मंगळवारी (दि.23) मैदानाची पाहणी करण्यासाठी जात असताना आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे घटनास्थळी मोठी गोंधळ निर्माण झाला. तसेच आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

यावेळी बच्चू कडू यांनी दावा केला आहे की, 22 आणि 23 एप्रिलसाठी अमरावतीतील सायन्स कोर मैदान बुक केले आहे. त्यामुळे दोन दिवसांसाठी मैदानावर इतर कोणाचाही कार्यक्रम किंवा सभा होऊ नये, अशी कडू यांची मागणी आहे.

दरम्यान, आता याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपने सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आपल्याला सभेची परवानगी मिळालेली असताना मैदानावर भाजपचा हस्तक्षेप कसा? हे पाहण्यासाठी गेल्यानंतर आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

Exit mobile version