| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे क्ष-किरण विभागातील सिटीस्कॅन मशीन दि. 5 मेपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होती. या मशीनची दुरुस्ती करण्यात आली असून, यासाठी 4 लाख खर्च आला आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व क्ष-किरण विभागातील तांत्रिक कर्मचारी श्री. तरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, सद्य:स्थितीत अलिबाग जिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सर्वसामान्य रुग्ण, दारिद्य्ररेषेखालील, अपंग व गरीब आणि इतर रुग्णांसाठी कार्यान्वित केली आहे, असे डॉ. सुहास माने यांनी सांगितले.