देवकान्हे येथे भात लागवड

। खांब । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या दाखविण्यात आले. येथील प्रगत शेतकरी मोरेश्‍वर हरि भोईर यांच्या शेत जमिनीत सदरील चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सध्या आधुनिकीकरणाच्या काळात शेतकरी वर्गही आधुनिकीकरणाकडे वळून शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवनवीन बी बियाणे,खते, किटकनाशके तसेच शेतीमध्ये ट्रॅक्टर व पॉवरट्रेलरचा वापर आदी गोष्टींवर भर दिला जात आहे. जेणेकरून शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढावे. याच उद्देशाने विविध पद्धतींचा वापर केला जात आहे. त्याच अनुषंगाने शेती क्षेत्रात यांत्रिक पद्धतीने भात लावणी व चतुसुत्री भात लागवडीचाही प्रयोग केला जात आहे. चारसुत्री भात लागवडीने भात लागवडीचे काम योग्य वेळेत व अल्प खर्चिक आहे. त्याचप्रमाणे कालांतराने वाढत जाणारे अनावश्यक तण सहजपणे काढता येतात. याच उद्देशाने प्रगत शेतकरी मोरेश्‍वर हरि भोईर यांच्या भात शेतीमध्ये चारसुत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असल्याची माहिती कृषीनिष्ठ शेतकरी नथुराम भोईर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.

Exit mobile version