। सुतारवाडी । वार्ताहर ।
रोहा तालुककयातीली गौळवाडी येथील राधाकृष्ण तरुण मित्र मंडळातर्फे राधाकृष्ण मंदिर परिसर आणि प्राथमिक शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या उपयुक्त रोपांची लागवड उपसरपंच कविता तटकरे तसेच राधाकृष्ण तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष कृष्णा तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राधाकुष्ण तरुण मित्र मंडळातर्फे दरवर्षी विविध उपयुक्त रोपांची लागवड केली जाते. यावेळी राजेंद्र महाडिक, सुरेश दळवी, संतोष महाडिक, दिनेश तळकर, पांडुरंग पवार, प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षिका, मंडळाचे पदाधिकारी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौळवाडीत उपयुक्त रोपांची लागवड
