फडके नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ठाणे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त अंतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प, पेण यांच्या विद्यमाने आदिवासी शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींची संयुक्त कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आय.पी.एस. कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर तसेच वसतिगृहातील मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम उपस्थितांनी कौतुकाने अनुभवला.

Exit mobile version