| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडिगोच्या सध्याच्या संकटानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली आहे. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली असून सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत. या व्यतिरिक्त प्रवाशांना जास्त भाडे भरण्यापासून रोखण्यासाठी मंत्रालयाने भाडे मर्यादा लागू केल्या आहेत. सर्व विमान कंपन्यांना नवीन भाडे मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. या संकटकाळात, मंत्रालयाने विमान भाड्याचे रिअल-टाइम निरीक्षण करण्याचा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमान कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या या पावलामुळे आकाशाला भिडणाऱ्या विमान तिकिटांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
विमान कंपन्यांच्या मनमानीला लगाम
