वकिलाच्या पत्नीची फसवणूक

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सीवूड्स भागात राहणार्‍या एका महिलेला घरबसल्या पैसे कमवण्याचे काम देण्याचा बहाणा करून 14 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांच्या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी क्टनुसार गुन्हा दाखल आहे. सीवूड्स सेक्टर- 48 मध्ये राहणार्‍या पीडित महिलेचे पती वकील आहेत. या महिलेच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एका महिलेने ङ्गमीडिया टू विन सोशल मीडियाफ एजन्सी मुंबई नावाची कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगितले. तसेच घरबसल्या पैसे कमावण्याचे काम देण्याचा बहाणा केला. तसेच त्यांना यूट्युबच्या दोन लिंक पाठवून त्याला सबस्क्राईब करण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने यूट्युबवरील व्हिडीओला सबस्क्राईब केल्यानंतर त्यांना 30 टक्केप्रमाणे परतावा देऊन या महिलेचा विश्‍वास संपादन करत 14 लाख 30 हजारांची फसवणूक केली आहे.

Exit mobile version