जागतिक आरोग्य दिनी आयएमएतर्फे सायकल रॅली

आपले ग्रह आपले आरोग्य दिला संदेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) अलिबाग शाखेच्या वतीने आपले ग्रह आपले आरोग्य हा पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जलप्रदूषण, वायुप्रदुषण यामुळे निरनिराळे आजार वाढत आहेत. आपली पृथ्वी स्वच्छ रहावी यासाठी समाज प्रबोधन करण्याकरिता या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग समुद्रकिनारा ते आरसीएफ गेट, वायशेत या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) अलिबाग शाखेचे अध्यक्ष डॉ विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखालील या सायकल रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांच्यासह डॉ राहूल म्हात्रे, डॉ समीर नाईक, डॉ शिवपाल तिवारी, डॉ संजीव शेटकार आदी डॉक्टर्स सहभागी झाले होते.

Exit mobile version