पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल रॅली

। उरण । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा समुद्र किनार्यावरुन असे 650 किलोमीटर सायकलवरून प्रवास उरणमधील विवेक भगत व रोहा तालुक्यातील सूरज खांडेकर हे दोन तरुण करत आहेत.
पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी हे दोन तरुण उरण ते गोवा असा सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर सायकलने प्रवास करण्याचा संकल्प केला. त्यानुसार दिनांक 18नोव्हेबल रोजी त्यांनी उरण चारफाटा येथून प्रस्थान केला आहे. एकूण सहा दिवसाचा हा प्रवास असून 23 तारखेला ते गोव्याला सायकल वरून प्रवास करत पोहोचतील.
दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण, प्लास्टिकची समस्या यामुळे प्रदूषण विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे यांनी सांगितले. सदर उपक्रमाचे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, संतोष पवार, प्रशांत पाटील,उरण सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Exit mobile version