इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून सायकल रॅली

। रसायनी । वार्ताहर ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी दहा वाजता शिवसेना शाखा मोहोपाडा येथून सायकल व बैलगाडी रॅली काढून पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंधन दरवाढ निषेध रॅली मोहोपाडा बाजारपेठेतून दांडफाटा अशी काढण्यात आली. या निषेध रॅलीत दांडफाटा येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ धोरणाचा निषेध करण्यासाठी बैलगाडी व सायकल चालवली. यावेळी शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या सायकल रॅलीत सायकलला केंद्र सरकारचे निषेध करणारे फलक लावण्यात आले होते. या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील सर्व शाखाप्रमुख आदी उपस्थित होते.

मुरुडमध्ये शिवसेना आक्रमक
मुरूड शिवसेना-युवा सेना महिला आघाडी मार्फत महागाईविरोधात सायकल रॅली काढून मुरूड नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, युवा सेना तालुकाप्रमुख दिपेश वरणकर, शहर प्रमुख आशिल ठाकूर, स्नेहा पाटील, प्रमोद भायदे, मुग्धा जोशी, शुभांगी करडे, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, आदेश दांडेकर, हरि भेकरे, सुदेश घुमकर, राजेश मुळेकर, विक्रात कुबल, संतोष माळी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.‘हेच का अच्छा दिन’चे सायकलवर बॅनर लावून मुरूड बाजारपेठ ते मुरूड तहसीलदार कार्यालयापर्यंत केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल रॅली काढण्यात आली.

कर्जतमध्ये युवासेनेकडून आंदोलन
कर्जत येथे युवासेनेच्या माध्यमातून इंधन दरवाढी विरोधात युवासैनिकांनी सायकली सोबत आणून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. कर्जत शहरातील मुरबाड राजमार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपापासून श्रीराम पूल ते आमराई पूल या दरम्यान आंदोलन करण्यात आले. युवासेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या पदाधिकारी यांनी रिलायन्स पेट्रोल पंप ते आमराई पूल या दरम्यान सायकल चालवत इंधन दरवाढ अशीच होत राहिली तर कायमस्वरूपी सायकल चालवण्याची वेळ जनतेवर येईल. ही भीती सर्वसामान्य जनतेच्या ध्यानात यावी यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवासेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघ युवा अधिकारी संदीप बडेकर, कर्जत विधानसभा मतदारसंघ सचिव प्रथमेश मोरे कर्जत तालुका युवा अधिकारी अमर मिसाळ, कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत हडप, उपतालुका अधिकारी प्रसाद थोरवे, नितीन झांजे, जयेंद्र देशमुख, स्वप्नील मते, रोहित पाटील, कर्जत युवासेना समन्वयक योगेश जाधव, अनिकेत भोईर त्याच बरोबर युवासेना पदाधिकारी साई मसणे, नितीन धुळे, निल मुने, दर्शन सालेकर आणि युवासैनिक उपस्थित होते.

Exit mobile version