| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली व परिसरात सायकल चोरांचा सुळसुळाट झाला असून, विशेषतः लहान मुलांच्या सायकल चोरीला जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे पालक वर्गात भीतीच वातावरण पसरले आहे.
खोपोली नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावातील एकाच दिवशी लहान मुलांच्या तीन सायकली चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये विराज माडपे, आराध्य मुंडे व पवार अशी तीन मुलांची नावे असून सायंकाळी दारात उभी केलेली सायकल चोरून नेल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. या चोरीच्या प्रकाराने लव्हेज व परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली आहे.
दरम्यान याबाबत खोपोली पोलिसांमध्ये पालकांनी तक्रार दाखल केली असून, याबाबत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात प्रारंभ केला. लवकरच अशा स्वरूपाच्या चोऱ्या करणाऱ्यांना आम्ही ताब्यात घेऊ असे यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. तर मागील काही महिन्यांपासून भंगारवाल्या व्यापारांचा खोपोली व परिसरात पसारा वाढत असून, या भंगार विक्रेत्यांकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
खोपोली परिसरात सायकल चोरांचा सुळसुळाट
