सायकलपटू सई पाटीलची काश्मीर ते कन्याकुमारी सफर

। पनवेल । वार्ताहर ।
ठाण्याच्या बाळकुम येथील दहा वर्षीय सायकलपटू सई पाटील या बालिकेने पर्यावरण संरक्षण आणि मुलींना शिकवा मुलींना वाढवा हा सामाजिक संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी असे चार हजार किलोमीटर सायकल मोहीम सुरू केले आहे.

दोन हजार किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार केले असून पनवेल येथून तिने उर्वरित दोन हजार किलोमीटर प्रवासाचा शुभारंभ केला. माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांनी सईला शुभेच्छा देत ती विश्‍व विक्रमाला गवसणी घालेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

सई ही 10 वर्षाची असून, स्व.दि.बा.पाटील सांस्कृतिक क्रीडा मैदान,रोडपाली,पनवेल या ठिकाणी तीचे स्वागत करण्यात आले.या प्रसंगी तिचे वडील आशिष पाटील हे देखील सोबत आह.जलपरी या नावाने ती प्रसिद्ध आहे. दर दिवशी ती 100 किलो मीटर सायकलने प्रवास करीत आहे.

सईचे वय लहान असले तरी तिने मोठा संदेश देण्यासाठी सायकल मोहीम आरंभली आहे. आम्ही सगळे या मोहिमेत तिच्या पाठीशी आहोत. पुढील दोन हजार किलोमीटरचा टप्पा देखील ती यशस्वीपणे, सुरळीत पार पाडेल,.

डॉ.संजीव नाईक,माजी खासदार


प्रत्येकाने सायकल जरूर चालवावी यामुळे प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत तर होईलच शिवाय इंधनाची देखील बचत होईल.

सई पाटील,सायकलपटू

Exit mobile version