| ओडिशा | वृत्तसंस्था |
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता चक्रीवादळात रूपांतरित झाला असून, तो वेगाने उत्तर-वायव्य दिशेने किनाऱ्याकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ गुरुवारी रात्रीपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तविली होती. चक्रीवादळ धडकेल तेव्हा या भागात ताशी 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळाचे परिणाम मात्र अनेक दिवस कायम राहतील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि पारादीप किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.






