डी. गुकेशचे झोकात पुनरागमन

| पोलंड | वृत्तसंस्था |

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आव्हानवीर असलेल्या डी. गुकेश याने सुपरबेट जलद व ब्लिटझ्‌‍‍ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये झोकात पुनरागमन केले. पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर गुकेशने शुक्रवारी भारताच्याच आर. प्रज्ञानंद व जर्मनीच्या विन्सेट केमर यांच्यावर दमदार विजय संपादन केले. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखण्यातही त्याला यश मिळाले.

डी. गुकेशला पहिल्या दिवशी दोन लढतींत पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर एका लढतीत ड्रॉवर समाधान मानावे लागले होते; पण शुक्रवारी त्याने चौथ्या फेरीच्या लढतीत आर. प्रज्ञानंद याला 41 चालींमध्ये पराभूत करताना उल्लेखनीय कामगिरी केली. गुकेश याने पुढील फेरीत केमर याच्यावर विजय साकारला. या लढतीत गुकेश याने तांत्रिकदृष्ट्या सरस खेळ केला. आता गुकेशने सहा गुणांची कमाई केली आहे.

Exit mobile version