माजी आ. डी. एन.चौलकर यांचा एस. टी संपाला पाठिंबा

। कोर्लई । वार्ताहर ।
शासनात विलिनीकरणासाठी सुरू असलेल्या एस टी कर्मचार्‍यांच्या संपाला कोणत्याही कामगार संघटनांना अथवा राजकिय पक्षांना सोबत न घेता एस टी कर्मचार्‍यांनी स्वबळावर आपला लढा द्यावा असे मत माजी आ. डी. एन. चौलकर यांनी मुरुड मधील निवासस्थानी आयोजित बैठकीत व्यक्त केले.
शासनात विलिनीकरणासाठी सुरू असलेल्या एस टी कर्मचार्‍यांच्या संपाचा दहवा दिवस असून सदरचा लढा हा संघटना-पक्ष विरहित कामगारांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा लढला जात असल्याचे एस टी कर्मचार्‍यांनी सांगितले. तसेच जो पर्यंत शासनामध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत सर्व कर्मचार्‍यांना निलंबित सेवा किंवा इतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली तरी सुद्धा सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. असा निर्धार यावेळी मुरुड मधील एस टी कर्मचार्‍यांनी व्यक्त केला.

Exit mobile version