पीएचडीच्या वक्तव्यावरून दादांची दिलगिरी

| नागपूर | वृत्तसंस्था |

पीएचडीबाबत माझा तोंडातून शब्द गेला काय दिवा लावला जाणार. त्याचा गाजावाजा करण्यात आला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे. अनेकांनी राजकिय नेत्यांवर पीएचडी केली. पीएचडी करण्यावर दुमत नाही. पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल , असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. येत्या 15 डिसेंबरला अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेणार आहे. रात्री 10 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली. राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

Exit mobile version