| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहीवली येथील स्मशानभूमीच्या आवारात आ. महेंद्र थोरवे फाऊंडेशन व कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरात दोन स्मशानभूमी आहेत. त्यापैकी एक नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली आहे, तर दुसरी संस्थेच्या ताब्यात आहे. संस्थेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमीचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे गॅसदाहिनी असलेल्या दहीवली येथील स्मशानभूमीवर अधिक ताण पडत आहे. मात्र, या स्मशानभूमीची अवस्था बिकट आहे. स्मशाभूमीच्या छतावरील पत्रे सडले आहेत, तर काही ठिकाणी पत्रेच नाहीत. स्मशाभूमीच्या आवारात झाडे झुडपे वाढली आहेत.
याबाबत आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन व कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्याता आले. नगरसेवक संकेत भासे, शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या पुढाकारातून, शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून दहीवली येथील स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी पूर्ण स्मशानभूमी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळेस शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.