परतीच्या पावसामुळे विज वितरण कंपनीने नुकसान

। कर्जत। वार्ताहर ।
परतीच्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील विज वितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, रोज सायंकाळी विज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, त्यामुळे दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण होत आहे, सध्या रोज सायंकाळी आकाश काळ्या ढगांनी भरून येत आहे आणि वादळी व विजेच्या कडकडाटासह सह मुसळधार पावसाला सुरुवात होते.
लख्ख विजेचा प्रकाश आणि जोरदार ढगांचा कडकडाट आणि पावसामुळे कर्जत तालुक्यात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत
काल दि.12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी व विजेच्या कडकडाटासह पावसामुळे कळंबोली येथुन कर्जत साठी येणार्‍या मुख्य विज वाहिनीवर झाड पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला होता तर नाना मास्तर नगर ते माळवाडी रोड जवळ विज वितरण वाहिन्यांवर झाडे पडल्याने वाहक ताराचे नुकसान झाले होते यामुळे सांयकाळी पासून रात्री पर्यत विज प्रवाह खंडित झाला होता, मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या देखरेखीखाली कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करून विज पुरवठा पूर्ववत केला.

Exit mobile version