सुदैवाने जीवितहानी नाही
| तळा | प्रतिनिधी |
रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तळा शहरात घरावर झाड कोसळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तळा तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. रात्रभर कोसळत असलेल्या पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तळा शहरातील परीट आळी येथील संतोष तळेकर यांच्या घरावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भलेमोठे झाड कोसळले. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे संतोष तळेकर व परिवार खडबडून जागे झाले व घरावर भलामोठा झाड कोसळल्याचे पाहून त्यांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. तसेच या घटनेची माहिती तळा तहसील कार्यालयाला दिली. घटनेची माहिती मिळताच तहसील कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, घरासमोरील संपूर्ण शेड कोसळून भिंतीला तडा जाऊन घराचे नुकसान झाले आहे.