। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अचानक हवामानात बदल घडून आल्याने वारा, पाऊस यांनी चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी व बागायतदार यांना अतोनात नुकसानीस सामोरे जावे लागले. अवकाळी आलेल्या पावसाने बेसावध असलेले सुपारी व्यापारी व बागायतदार यांच्या सुपारीस पाणी लागल्याने मोठी झळ बसली आहे, झाडावरून उतरवण्यात आलेल्या सुपारींना पाणी लागल्याने सुपारीचे नुकसान झाले असून अगदी कमी किमंतीत व्यापार्यांना विक्री करावी लागेल अशी खंत येथील बागायतदारांनी व्यक्त केली. तर सुपारी व्यापारी यांनी फंडात ठेवलेली सुपारी पावसाने भिजल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
फंडाच्या माध्यमातून ही खरेदी केलेली सुपारी उन्हात ठेवून सुकवली जाते. परंतू अवकाळी पावसाने या सुपारीस पाणी लागल्याने सुपारी विक्रीस योग्य भाव मिळणार नाही.
सुरेश घरत-कोटकर, सुपारी व्यापारी