17 प्राथमिक शाळांसह 32 अंगणवाड्यांचे नुकसान

महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यामध्ये नुकत्याच आलेल्या महापूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शहराजवळ असलेल्या आणि तालुक्यातील पूरग्रस्त भागातील 17 प्राथमिक शाळा आणि 32 अंगणवाडी इमारतींचे मोठ्या प्रमाणांमध्ये नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या इमारतींची दुरुस्ती जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तातडीने करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाड शहर आणि तालुक्याच्या सखल भागांमध्ये 22 जुलै रोजी आलेल्या महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. या पुरामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीच्या इमारतींप्रमाणे खासगी शाळांच्या इमारतींचेदेखील नुकसान झाले. जि.प. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीवरुन तालुक्यामध्ये 17 प्राथमिक शाळा आणि 32 अंगणवाडी इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बिरवाडी, आकले, टेमघर, खरवाली, भोगाव, कोंडीवते, सव, जीते, आसनपोई, लाडवली ऊर्दु शाळा, पारमाची, माझेरी, राजेवाडी, बिरवाडी मुलांची शाळा इत्यादी शाळा इमारतींचे समावेश आहे.

त्याचप्रमाणे 32 अंणवाड्या इमारतींचे नुकसान झाले असून, त्यामध्ये बिरवाडी, खरवली, भोगाव, जिते, सव, कोडींवते, राजेवाडी यासह तालुक्यातील पूरग्रस्त भागातील अंगणवाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती महाड पंचायत समितीचे महिला बाल विकास प्रकल्पाच्या अधिकारी श्रीमती बने यांनी दिली.

Exit mobile version