जलवाहिनी फुटल्याने शेतीचे नुकसान

जिते गावातील शेतकरी हवालदिल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील जिते गावातील शेतकर्‍यांच्या जमिनीतून नळपाणी योजनेची जलवाहिनी जाते. ती जलवाहिनी गेली दहा दिवसांपासून फुटली आहे. त्यामुळे तेथील सात शेतकर्‍यांच्या भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे. भाताच्या शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक नळपाणी योजनेच्या पाण्यामुळे भिजून 100 टक्के नुकसानग्रस्त झाले आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे केली जात नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नेरळ नळपाणी योजनेच्या जलवाहिन्या जिते गावाच्या हद्दीतून जात आहेत. उल्हास नदीमधून उचललेले पाणी नेरळमध्ये जाताना साधताना तीन किलोमीटरचे अंतर असून, भागातील शेतकर्‍यांच्या शेतात सध्या भाताचे पीक उभे आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेची जलवाहिनी दहा दिवसांपूर्वी फुटली आहे. नळपाणी योजनेमधून पाणी दररोज 18 उचलले जात असून, जलवाहिनी फुटल्याचा सर्वाधिक तडाखा जिते गावातील शेतकर्‍यांना बसला आहे. जिते गावातील सर्व शेतकरी हे प्रयोगशील असून, उन्हाळ्यातदेखील वेगवेगळ्या प्रकाराची शेती करतात. त्या त्यावेळी सातत्याने जलवाहिनी फुटते आणि शेतकर्‍यांचे नुकसान होत असते. तरीदेखील ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही तात्काळ केली जात नसल्याने जिते गावातील शेतकरी संतप्त आहेत.

जलवाहिनीमधून अस्ताव्यस्त पाणी तेथील वेगवेगळ्या भागात पसरले असून, त्या पाण्याचा फटका जिते गावातील सात शेतकर्‍यांना बसला आहे. जिते गावातील शरद जाधव, शशिकांत जाधव, शांताराम जाधव, वसंत घरत, देविदास जाधव, अभय जाधव, प्रकाश जाधव या सात शेतकार्‍यांच्या शेतात नळपाणी योजनेचे पाणी साचून राहिले आहे.गेली अनेक दिवस परतीचा पाऊसदेखील झाला नाही आणि तरीदेखील जलवाहिनी फुटलेले पाणी यांनी भाताची शेतं पूर्ण भरली आहे. त्याचा परिणाम भाताच्या शेतात उभे असलेले भाताचे पीक जमिनीपासून सडून जाऊ लागले आहे. तर कापून ठेवलेले भाताचे पीक हेदेखील पाण्यामुळे सुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबद्दल स्थानिक शेतकर्‍यांनी जिते गावातील शेतकर्‍यांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीदेखील नेरळ ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. शरद जाधव यांनी आम्ही ग्रामपंचायतीला कोणताही मोबदला न घेता जलवाहिन्या टाकण्यास परवानगी दिली. मात्र, तरीदेखील आमच्या शेतातून जाणार्‍या जलवाहिन्या सतत फुटत असल्याने शेतकरी नाराज आहेत.

Exit mobile version