वीज पडून घराचे नुकसान

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे परिसरात पावसाने काही दिवसांपासून तुरळक शिडकावा सुरु केला आहे. नागोठणे परिसरात पावसाचे आगमान झालेले असतानाच गुरुवारी, (दि.13) सायंकाळी ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने नागोठणे शहर व परिसराला चांगलेच झोडपून काढले. यातच नागोठण्याजवळील वेलशेत येथे अजित राम घोडिंदे यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांच्या घराचे प्लास्टर व इतर बांधकामाचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती रोशन पारंगे यांनी वेलशेतच्या तलाठ्यांना दिली. याप्रकरणी वेलशेतचे तलाठी दिलीप खंदारे यांच्याकडून घोडिंदे यांच्या घराचा पंचनामा करण्यात आला आहे.

Exit mobile version