उरणमध्ये मालमत्तेचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

| उरण | वार्ताहर |

जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाउस पडत असून उरणमध्येही मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसाचा अनेक गावांना तडाखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यातील चिरनेर, विंधणे, भेंडखळ, नवघर, मोठी जुई, जसखार, कंठवली, रांजणपाडा, कोप्रोली, खोपटा, कळंबुसरे, जेएनपीटी टाउनशिप, डाउरनगर, नागाव, म्हातवली, कुंभारवाडा आदि ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर, अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी घूसून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्यातरी कोणतेही जिवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे भातशेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Exit mobile version