विजेचा खांब पडून वाहनाचे नुकसान

वणव्यामुळे झाड विजेच्या तारांवर कोसळून दुर्घटना

| पाताळगंगा | वार्ताहर |

रस्त्यालगत लागलेल्या वणव्यांचा त्रास वृक्ष, औषधी वनस्पती, त्याचबरोबर मुक्या प्राण्यांसमवेत सर्वांनाच सहन करावा लागत आहे. असाच प्रकार सावरोली-खारपाडा मार्गावरील आंबिवली येथे घडला. जळालेला वृक्ष विजेच्या तारांवर पडला. त्यावेळी हा विजेचा खांब (एमएच-46-बीयू-2445) ट्रकवर पडल्याने ट्रकचे नुकसान झाले आहे. वाहनचालकाने प्रसंगावधान दाखविलेल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, कुंभीवली येथून खारपाडा यामार्गे हा ट्रक जात होता. चालकाने तातडीने वाहनावर नियंत्रण मिळविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या चालकाचे मालक माजी सरपंच ज्ञानेश्‍वर मालकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. या घटनेची माहिती मिळताच चौक येथील वीज कर्मचार्‍यांनी या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा बंद केला. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून, या वाहनाची पुढची काच पूर्णपणे तुटली आहे. या मार्गावर कारखाने मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहनांची सातत्याने वर्दळ सुरु असते.

Exit mobile version