श्रमदानातून विद्यार्थ्यांनी बांधले बंधारे

| पाताळगंगा | वार्ताहर |

पावसाळ्यात पडलेले पाणी पुढील काही महिने तेथेच जमा राहावे यासाठी वनराई बंधारे महत्वाचे ठरत असते. मात्र तुरळक ठिकाणी वनराई, बंधारे बांधले जातात. या पाण्य़ाचा उपयोग पशु, पक्षी, गुरे यांच्यासाठी होत असते. या सर्व बाबींचा अभ्यास करून रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून आणि तालुका कृषी अधिकारी सुनिल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कदम, यांच्या सहकार्याने वनराई बंधारे बांधण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कदम, अंगणवाडी सेविका नीता राऊत, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड, विषय शिक्षिका सरस्वती कवाद, स्वयंसेविका निकिता गडगे व साक्षी जांभुळकर, तसेच ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मयुर ठोंबरे तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी या वनराई बंधारे बांधण्यासाठी उपस्थित होते.

Exit mobile version