। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
पाली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या टॉपवर्थ इंग्रजी माध्यम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि.27) मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात छोटा शिशु, मोठा शिशु व इयत्ता पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकाराचे नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या भाषणाने झाली. तसेच, शाळेतील शिक्षिकांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी देखील भाषण केले. उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने आभार व्यक्त करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालक, शिक्षक आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असून त्यांचा आत्मविश्वासदेखील वाढला असल्याचे शाळेच्या शिक्षकांकडून बोलले जात आहे.