श्रीवर्धनमध्ये भेसळयुक्त मिठाईचा धोका

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
दिवाळी सण सुरू झाल्यामुळे श्रीवर्धन शहरातील स्वीटमार्ट दुकानातून दुग्धजन्य पदार्थ तसेच मिठाई घेण्याचे नागरिकांचे प्रमाण या वर्षी जास्त असुन नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत अन्नभेसळ प्रतिबंधक खाते व नगरपरिषद उदासीन असुन स्वीटमार्ट मधील दुग्धजन्य पदार्थांची तपासणी होते की नाही ह्या बाबतीत नागरिक साशंक आहेत. नवीन कायद्यानुसार मिठाईचा खोका, ट्रे वर संबंधित उत्पादन दिनांक, मुदत संपण्याची दिनांक याचा उल्लेख बंधनकारक आहे. परंतु या गोष्टीचा विसर स्वीटमार्ट चालकांना पडलेला आहे. श्रीवर्धन शहरात गेल्यावर्षी बाजारपेठेतील एका नामांकीत स्वीटमार्ट मधुन ग्राहकांनी मिठाई खाण्यास घेतली असता मिठाईमधे आळ्या आढळून आल्या होत्या. ग्राहकांनी त्या मिठाई बाबतीत नगरपरिषदेत तक्रार दाखल केल्यावर स्वीटमार्ट चालकावर कारवाई बडगा उगारत संबंधित स्वीटमार्ट सह अन्य स्वीटमार्ट दुकानांचे परवाने ताब्यात घेऊन अन्नभेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी हे प्रकरण सोपवले होते.

Exit mobile version