। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन बाजार पेठेतील तहसील कार्यालय नव्या प्रशासकीय भवनात स्थलांतरित झाल्याला सुमारे सात ते आठ वर्षे झाली आहेत. परंतु, तहसील कार्यालयाची धोकादायक झालेली व मोडकळीस आलेली जुनी इमारत इतक्या वर्षात जमिनदोस्त करण्यात आलेली नाही. तिचा जिन्यासह एकेक भाग हळूहळू कोसळू लागला होता. या जागेच्या समोरच पंचायत समिती कार्यालय असल्यामुळे तेथे तालुक्यातील नागरिकांचा सतत राबता असतो. यामुळे कधीतरी तहसीलची जुनी इमारत अचानक कोसळून एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. ही गंभीर बाब कृषीवलच्या माध्यमातून अनेकदा प्रसिद्ध करून याचे गांभीर्य दर्शविले होते.