नांदगावमधील धोकादायक वीजेचा खांब; महावितरणचे दुर्लक्ष

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत लगत गेल्या अनेक दिवसांपासून गंजलेल्या स्थितीत असलेला वीजेचा खांब धोकादायक असून याबाबत सरपंच सेजल घुमकर व माजी उपसरपंच अस्लम हलडे यांनी निवेदन देण्यात येऊनही याकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

अलिबाग-मुरुड रस्त्यावर नांदगाव बाजारपेठेत ग्रामपंचायत इमारत लगतच्या रस्त्यावर असलेला वीजेचा खांब धोकादायक झाला असून जवळपास जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नांदगाव नं.1 मध्ये विद्यार्थी शिकत आहेत. तसेच, याठिकाणी एस.टी.थांबा शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याठकाणी गंजलेल्या स्थितीत असलेला वीजेचा खांबाची दुरवस्था लक्षात घेऊन महावितरणच्या अधिकारी वर्गाने तातडीने वीजेचा खांब बदलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version