रस्त्यावर झेब्रा पट्टे गतीरोधक बसवावेत
प्रवासी व नागरिकांची मागणी
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड-जंजिरा पर्यटनात साळाव ते मुरुड दरम्यान वाहनांची वाढती वर्दळ असून मजगांव स्थानकावर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन झेब्रा पट्टे मारावेत किंवा गतीरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. मुरुड-जंजिरा पर्यटनात जंजिरा किल्ला, कुडालेणी आदी पर्यटन स्थळे, समुद्र सफरीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या रस्त्यावर सातत्याने वाढती वर्दळ असते. मजगांव स्थानक दरम्यान अतिवेगाने येणार्या वाहनांमुळे अनेक वेळा छोटेमोठे अपघात झाले आहेत. याठिकाणी वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर झेब्रा पट्टे किंवा गतीरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.







