गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलचा पुण्यात डंका

। खोपोली । प्रतिनिधी ।

खालापुरातील विद्यार्थ्यांना कमीत कमी शैक्षिणक शुल्क आकारत दर्जेदार इंग्रजी सीबीएससी शिक्षण देणार्‍या केटीएसपी मंडळाच्या प.पू. गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेल्या मेहनतीमुळे पुण्यातील प्रिन्सिपल कॉन्क्लेव्ह सन 2024-25 साठी प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘आऊटस्टँडिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ लाइफ स्किल्स प्रोग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे तसेच शिक्षकांचे आणि संस्था चालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्पर्धा असतानाही संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील आणि सर्व सदस्यांनी जिद्दीने शाळा सुरू करण्यासाठीची निर्णय घेतला आणि शाळेला उभं करण्याची जबाबदारी जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव यांच्याकडे दिली. त्यांना शाळेचे पहिले मुख्याध्यापक गौरव तिवारी यांनी मोलाची साथ दिली.

Exit mobile version