। पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.5) सायंकाळी सलग दुसर्या दिवशी दर कोसळण्याची घटना घडली. धामणदिवी येथे 2020 मध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. मात्र घाटातील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू असून दरड कोसळलेल्या मार्गिकेवर दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कशेडी टेप वाहतूक पोलीस कक्षाचे उपनिरीक्षक चांदणे यांनी दिली.
पोलादपूर तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी चोळई गावाच्या हद्दीत दरड कोसळली असताना सलग दुसर्या दिवशीही धामणदिवी येथे दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. मात्र, कशेडी घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निकाराचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.