नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली; रस्त्यात वाहने अडकली

I नेरळ I प्रतिनिधी I

गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे माथेरान डोंगरातील माती ही दगडांसह खाली येण्याचे प्रकार घडत आहेत.एक दरड नेरळ-माथेरान घाट रस्त्यात रस्त्यावर आल्याने घाटरस्ता वाहनांच्या वाहतुकीस बंद झाला होता,मात्र स्थानिक आणि टॅक्सी चालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली.जुम्मापट्टी भागात ही दरड कोसळली असून यावर्षीच्या पावसाळ्यात घाटरस्त्यात दरड कोसळण्याची दुसरी घटना आहे.

नेरळ-माथेरान घाटात जुम्मापट्टी भागात आज 19 जुलै रोजी दुपारी दरड कोसळली. मागील 24 तासात माथेरानच्या डोंगरात 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे माथेरानच्या डोंगरातील दगड आणि माती हे पावसाचे पाण्याबरोबर खाली येत असतात.त्यामुळे दरड कोसळण्यच्या घटना घडत असतात.जुम्मापट्टी भागात रेल्वे मार्गाच्या अलीकडे असलेल्या लहान डोंगरातील माती दगड खाली आल्याने नेरळ-माथेरान घाटरस्ता बंद झाला आहे.मात्र मागील काही वर्षात घाटरस्ता रुंद करण्यात आल्याने लहान वाहने बाजूने जात आहेत.केवळ मोठी वाहनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने स्थानिकांच्या मदतीने दरड रस्त्यातून बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.

संपूर्ण दरड बाजूला करणे शक्य नाही,परन्तु अडकलेली वाहने नेरळ कडे किंवा माथेरान कडे जाऊ शकतील एवढा रस्ता मोकळा करण्याचे काम टॅक्सी चालक करीत आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यातील दरड कोसळण्यची ही दुसरी घटना असून सार्वजनिक बांधकाम विभाग पावसाळ्यात होणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना घडत आहेत.पावसाळ्यात पूर्वी जेसीबी मशीन घाटात थांबवून ठेवलेली असायची,तसे गेली दोन वर्षे बंद झाल्याने एक दोन तासात संपूर्ण दरड बाजूला करता येत नाही.मात्र स्थानिक दरवेळी पुढाकार घेऊन दरड बाजूला करतात आणि रस्ता मोकळा झाला की बांधकाम खाते तेथे येथे असा आरोप नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सनी चंचे यांनी केला आहे.

Exit mobile version